दिर्घ कथा लेखन स्पर्धा...
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६
"काय माझा गुन्हा...?" भाग २७
अँटी-रॅगिंग मीटिंग रूममधून गौरवी आणि सायली बाहेर पडतात…
सायलीच्या चेहऱ्यावर दिलासा असतो..., तर गौरवीच्या डोळ्यांत शांत ठामपणा उतरलेला दिसत असतो...
सायलीच्या चेहऱ्यावर दिलासा असतो..., तर गौरवीच्या डोळ्यांत शांत ठामपणा उतरलेला दिसत असतो...
तेवढ्यात...,
प्रा. देशमुख सरांचा आवाज ऐकू येतो...
“माधव देशपांडे… तु आत्ताच्या आत्ता माझ्या ऑफिसमध्ये ये...”
प्रा. देशमुख सरांचा आवाज ऐकू येतो...
“माधव देशपांडे… तु आत्ताच्या आत्ता माझ्या ऑफिसमध्ये ये...”
माधव क्षणभर थबकतो... आणि बाहेर पडणाऱ्या गौरवीकडे रागाने बघतो... तर प्रा. देशमुख सरांचा आवाज ऐकून गौरवी आणि सायली मागे वळून पाहतात... तर त्या दोघींना सुद्धा माधव त्यांच्याकडे रागाने बघत असलेला दिसतो...
गौरवी माधवकडे एक नजर टाकते व ती शांतपणे तिथून बाहेर पडते...
गौरवी माधवकडे एक नजर टाकते व ती शांतपणे तिथून बाहेर पडते...
माधवच्या मनात प्रा . देशमुख सरांना भेटायला त्यांच्या ऑफिसमध्ये जायला नकोसं वाटत असतानाही, चेहऱ्यावर नकली आत्मविश्वास आणून तो आपली पावले ऑफिसकडे वळवतो...
अँटी-रॅगिंग मीटिंगनंतर प्रा. देशमुख सरांचं ऑफिस...
खोलीत शिस्तपणा अगदी भरुन आहे... प्रत्येक वस्तू जागच्या जागी व व्यवस्थितरीत्या मांडून ठेवली आहे...
व भिंतीवर तर संविधानाची प्रत ताठ मानेने झळकताना दिसत होती..., तसेच UGC नियमांची फाईल, आणि टेबलावर Anti-Ragging Committeeची नोंदवही असते...
व भिंतीवर तर संविधानाची प्रत ताठ मानेने झळकताना दिसत होती..., तसेच UGC नियमांची फाईल, आणि टेबलावर Anti-Ragging Committeeची नोंदवही असते...
प्रा. देशमुख सर खुर्चीत बसलेले व त्यांच्या समोर उभा माधव होता... ज्याच्या आज पहिल्यांदाच नजरेत उतावळेपणा दिसत नव्हता....
प्रा. देशमुख सर थेट मुद्द्यावर येत बोलायला सुरुवात करतात...
“माधव…
तुला फक्त सस्पेन्ड केलं आहे, हे लक्षात ठेव...”
“माधव…
तुला फक्त सस्पेन्ड केलं आहे, हे लक्षात ठेव...”
ते थोडं थांबतात…
आणि मग गंभीर आवाजात पुढे म्हणतात...
“आम्ही अजून पोलिसांत Anti-Ragging ची तक्रार दाखल केलेली नाही...”
आणि मग गंभीर आवाजात पुढे म्हणतात...
“आम्ही अजून पोलिसांत Anti-Ragging ची तक्रार दाखल केलेली नाही...”
माधव ते शब्द ऐकून आपला आवंढा गिळंकृत करतो...
“जर ती तक्रार दाखल केली असती ना…”
सरांची नजर थेट त्याच्या डोळ्यांत रोखलेली असते...
“…तर आज तू इथे उभा नसतास...”
सरांची नजर थेट त्याच्या डोळ्यांत रोखलेली असते...
“…तर आज तू इथे उभा नसतास...”
टेबलावरची फाईल उघडत सर वाचायला सुरुवात करतात...
UGC Anti-Ragging Regulations, 2009
“रॅगिंग म्हणजे...
मानसिक छळ करणं,
अपमान करणं,
समोरच्याच्या मनात भीती निर्माण करणं,
जात, नाव, रूप, पार्श्वभूमी यावरून हिणवणं,
एखाद्या विद्यार्थ्यावर दबाव टाकणं…”
वाचून सर फाईल बंद करतात...

व पुन्हा बोलू लागतात...
“आणि यावर शिक्षा काय असते माहिती आहे का...?”
ते एवढं बोलून पुन्हा मुद्दाम थांबतात...
“आणि यावर शिक्षा काय असते माहिती आहे का...?”
ते एवढं बोलून पुन्हा मुद्दाम थांबतात...
“कॉलेजमधून निलंबन किंवा कायमची हकालपट्टी, तसेच FIR नोंद, आणि भविष्यात कोणत्याही कॉलेजमध्ये प्रवेशावर बंदी...”
हे ऐकून माधवची मान नकळत खाली झुकते...
सरांचा आवाज अधिक ठाम होतो...
“रॅगिंग ही मस्करी नाही… UGC नियमांनुसार तो सरळसरळ गुन्हा आहे... आणि त्याची शिक्षा कॉलेजमधून हकालपट्टीपासून ते थेट तुरुंगवासापर्यंत जाऊ शकते...”
क्षणभर खोलीत पूर्ण शांतता पसरते...
“रॅगिंग ही मस्करी नाही… UGC नियमांनुसार तो सरळसरळ गुन्हा आहे... आणि त्याची शिक्षा कॉलेजमधून हकालपट्टीपासून ते थेट तुरुंगवासापर्यंत जाऊ शकते...”
क्षणभर खोलीत पूर्ण शांतता पसरते...
मग सर शेवटी म्हणतात...
“आज तुला एक संधी दिली आहे... त्या संधीचे सोने कर कारण
पुन्हा अशी संधी तुला परत मिळणार नाही.... कळलं...”
माधव मान खाली घालून शांतपणे उभा असतो...
“आज तुला एक संधी दिली आहे... त्या संधीचे सोने कर कारण
पुन्हा अशी संधी तुला परत मिळणार नाही.... कळलं...”
माधव मान खाली घालून शांतपणे उभा असतो...
तेव्हा पुन्हा सर त्याला बोलतात...
"तुला हि जी एक संधी मिळाली आहे ना ते त्या मुलीमुळे... कारण तीनेच हे प्रकरण इथेच संपवून टाकायला सांगितले... आणि तुला आणि तुझ्या त्या मित्रांना फक्त एक आठवड्यांसाठी सस्पेन्ड केले कारण तुमच्या अभ्यासावर त्याचा परिणाम होऊ नये... कळलं का मि. माधव देशपांडे... आता तुम्ही जाऊ शकता..." एवढं बोलून सर आपल्या लाकडी खुर्चीत स्थानापन्न होतात...

तर माधव काही न बोलता मागे वळतो… आणि सरळ ऑफिस बाहेर पडतै...
जेव्हा तो दरवाज्याबाहेर पडतो तेव्हा त्याचा आत्मविश्वास नाहीसा झालेला असतो...
जेव्हा तो दरवाज्याबाहेर पडतो तेव्हा त्याचा आत्मविश्वास नाहीसा झालेला असतो...
क्रमशः....
©® प्राची कांबळे (मिनू)
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा